Price of Petrol in India

Leave a Comment
आपण जे पेट्रोल खरेदी करतो त्याची खरी किंमत कशी ठरते असा प्रश्न सर्वांना पडला असतो. यासाठी साधं गणित आहे. आपण यापूर्वीच्या किंमतीचा आधार घेऊन या गणिताचा विचार करून या. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमत प्रति बॅरलला ११२.५ डॉलर इतकी होती. याचे रुपयांत रुपांतर केले तर ५ हजार ८५ रुपये प्रति बॅरलला दिले जाते. एका बॅरलमध्ये साधारणतः १५८.७६ लीटर कच्चे तेल असते. त्यामुळे एका लीटरला ३२ रुपये कच्च्या तेलासाठी दिले जातात. या ३२ रुपयांमध्ये कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाचा खर्च मिळविला जातो. तो लीटरमागे ५२ पैसे असतो. पेट्रोलच्या किंमती ६ रुपये भांडवली खर्च मिळविला जातो. तसेच वाहतुकीचे ६ रुपये मिळवले जातात. हे सर्व एकत्र केल्यावर पेट्रोलची किंमत ४५ रुपये ६० पैसे होते. परंतु,या होणाऱ्या वाढीपूर्वी आपण ४५ रुपये ६० पैशांचे पेट्रोल पुण्यात ७१ रुपये ३५ पैसे, मुंबईत ६८ रुपये ३० पैसे, दिल्ली ६३ रुपये ४० पैशांना तर बंगळुरूमध्ये ७१ रुपयांना विकत घेतो.

पेट्रोलची खरी किंमत ४५ रुपयांच्या आसपास असताना आपण इतके का महाग पेट्रोल खरेदी करतो. तर त्याचे उत्तर आहे कर म्हणजे टॅक्स. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नाही की पेट्रोलच्या किरकोळ बाजारातील किंमतीवर मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारांचे कर लादले जातात. काही काही राज्यात हे ५० टक्क्यांपर्यंत आहेत. हे कर पेट्रोलच्या मूळ किंमतीवर लादले जातात. पेट्रोलची मूळ किंमत वाढ 54;ी की करही त्या प्रमाणात वाढतो. यामुळे सरकारच्या खजिन्यात आपोआप पैसा पडतो. सध्या केंद्राकडून लीटरमागे ६ रुपये ३५ रुपये हा व्हॅट आकारला जातो. तसेच ६ रुपये प्रती लीटर विशेष अतिरिक्त अबकारी कर, अतिरिक्त अबकारी कर म्हणून २ रुपये प्रति लीटर आकारले जाते. एकूण केंद्राकडून १४ रुपये ३५ रुपये आकारले जातात.

या संदर्भात आपण पेट्रोलची किंमत ५८ रुपये ९० पैसे असतानाचं गणित पाहू या.

पेट्रोलची मूळ किंमत – २८.९३ रु.
अबकारी कर – १४.३५ रु.
शिक्षण कर – ४३ रु.
डिलर कमिशन – १.०५ रु.
व्हॅट – ५.५० रु.
क्रुड ऑइल कस्टम ड्युटी – १.१० रु.
पेट्रोलवरील कस्टम ड्युटी – १.५४ रु.
वाहतूक खर्च - ६ रु.
एकूण – ५८.९० रु.

यावरून जेव्हा पेट्रोलची मूळ किंमत २८.९३ रुपये असल्यावर त्यावर आपल्या २३.९७ रुपये अतिरिक्त करापोटी मोजावे लागतात.
Powered by Blogger.

Followers